• +91 9422855220, 9860939577
 • manoharraosune@gmaile.com, kailasdeshmukh80@gmail.com

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ

मनोगत

member-img

मनोहर सुने

संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष
अ.भा. ग्रामिण पत्रकार संघ_

9422855220

आधुनिक जीवनावरील प्रसार माध्यमांचा वाढता प्रभाव आणि नवनव्या तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळे, वृत्तपत्राची संखात्मक तसेच गुणात्मक वाढ प्रचंड वेगाने होत आहे. त्यामुळेच वृत्तपत्र व्यवसायाला एक फार मोठ्या उद्योगाचे स्वरूप प्राप्त होवुन लक्षावधी लोकांच्या चरितार्थाचे ते साधन बनले आहे. या उद्योगातील वृत्तपत्राना खाद्य बातम्या पुरविण्याचे काम, वृत्तसंकलनाचे काम ग्रामीण वार्ताहार, मुक्‍त पत्रकार वर्षानुवर्षे करीत आहे.

वृत्तपत्रात वार्ता देणारा बातमीदार (पत्रकार) वृत्तपत्र लोकशाहीचा ४ था स्तंभ वृत्तपत्रात जाहिराती पुरविणारा ही बातमीदारच आहे. पत्रकारांना वृत्तपत्र मालक तुटपूंज्या मानधन शिवाय काहीही देत नाही. हा पत्रकार संघटीत झाला तर समाजसेवा या माध्यमातुन जसे किर्तनकार मंडळीना समाजकल्याण विभागामार्फत मानधन दिले जात आहे. त्याचप्रकारे पत्रकारानाही शासन मानधन व इतर सुविधा मिळाव्यात या दृष्टीकोनातुन ०४ एप्रिल १९९६ ला अमरावती अंबामातेच्या जिल्ह्यातुन 'जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाची ' स्थापना करण्यात आली होती. पुढे या पत्रकार संघाचे 'अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ' असे नामकरण झाले आहे.

वृत्तपत्रात बातमी देणारा ग्रामीण वार्ताहर, शहरी वार्ताहर एक छंद म्हणुन पत्रकारीता करीत आहे. त्यामुळे समाजात जनजागृती होत आहे. पत्रकारीतेच्या माध्यमातुन नागरी समस्याकडे शासनाचे लक्ष वेधले जावुन त्या सोडल्या जात असे. यामध्ये कालातरानंतर वृत्तपत्रे व्यवसाय (धंदा) झाले आहे. तर बातमीदाराचे (पत्रकाराचे) कुटूंबांना वाऱ्यावर सोडले आहे. पत्रकार जगला पाहिजे, त्यांचे कुटूंबही सुरक्षित राहिले पाहीजे, पत्रकाराने वत्तपत्र, वृत्तसंकलन छंद व्यतिरिक्त छोटासा व्यवसाय केला पाहिजे. याकरीता नागरीकांकडून ठेव जमा घ्यायची, त्यांना व्याज द्यायचे व गरजु नागरीक व पत्रकारांना कर्ज द्यायचे याकरीता स्व.राजेश दर्यापुरकर तत्कालीन मुख्य प्रशासक अमरावती जिल्हा सहकारी बँक यांच्या प्रेरणेने दि.२९ ऑक्टोंबर १९९७ ला पत्रकार संघ मार्फत पत्रकार व नागरिक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था स्थापण करण्यात आली आहे.

यामुळे पत्रकार संघाचे नाव राज्यभर झाल्याने जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे कार्य पाहुन राज्यातील व राज्याबाहेरील पत्रकार यामध्ये सभासद होण्यास इच्छुक झाल्याने दिनांक ११ फेब्रुवारी २००० ला पत्रकार संघटाचे नाव धर्मदाय आयुक्ताच्या आदेशानुसार 'अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ' असे नामकरण करण्यात आले.

ग्रामीण पत्रकारांना १. एस.टी.प्रवासात सवलत मिळावी. २. शासकीय विश्रामगृहात आरक्षणाची सोय असावी व इतर मागण्याचे निवेदन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व तत्कालीन अमरावती पालकमंत्री श्री.बिनायकराव कोरडे यांना व रोजगार परिवहन मंत्री श्री.दिवाकरराव रावते यांना स्व. राजेश दर्यापुरकर मार्फत दि.२१ डिसेंबर १९९८ ला निवेदन दिले होते. या पत्रानुसार २९ जानेवारी १९९९ ला तत्कालीन मुख्यमंत्री श्री.मनोहर जोशी यांनी अधिस्वीकृतीधारक 'पत्रकाराना प्रवासात १०%, प्रवास सवलत व २० रूपयात शासकीय विश्राम गृहावर आरक्षण व जिल्हास्तरावर पत्रकार भवन हा आदेश काढला होता.

पत्रकार संघाचे पाठपुराव्यामुळे पत्रकाराच्या काही अंशी मागण्या तत्कालीन श्री.मनोहराव जोशी शासनाने मंजूर केल्या होत्या त्यामध्ये ग्रामीण, शहरी (बातमीदार) व इले. मिडीया प्रत्रकारांचा अंर्तभाव नसल्याल्यामळे तसेच सदर सुबिधा अस्वीकृतीधारक पत्रकारांनाच असल्याने पत्रकार संघाने १४ डिसेंबर १९९९ ला नागपुर हिबाळी अधिवेशनावर पत्रकाराच्या मागण्या करीता पत्रकाराचा मोर्चा काढण्यात आला होता त्यावेळेस देण्यात आलेले निवेदन -

मराठी वृत्तपत्र सृष्टीचा तसेच इले.मिडीयाचा ग्रामीण भागातील विश्‍वासपात्र आधार म्हणजे ग्रामीण वार्ताहर आहे. त्यांच्या अनेक समस्या आहेत त्यापुढील प्रमाणे -.

 • कामगिरीवर असतांना एस.टी.भाड्यामध्ये व रेल्वेमध्ये १००% प्रवास सवलत असावी.
 • ग्रामीण वार्ताहर, इले.मिडीया वार्ताहर निवळ बातम्यावर जगु शकत नाही याकरीता छोटा उद्योग व्यवसायदृष्टीने त्यांना ५०% अनुदान व ५०% बँक कर्ज देण्यात यावे.
 • शैक्षणिक मागासलेपणा असल्याने पत्रकाराचे प्रशिक्षण शिबीर व शैक्षणिक सहल वार्षिक काढण्यात यावी.
 • पत्रकारावर हल्ले, पोलीस केसेस, सुडबुध्दीने कार्यवाही केल्या जात आहे. अशा वेळेस जिल्ह्याधिकाऱ्याची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय पत्रकारावर गुन्हा नोंदविण्यात येवु नये.
 • दहा वर्षापेक्षा जास्त पत्रकारीतेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना भविष्य निर्वाह निधीची योजना लागु करण्यात यावी. यामधील पत्रकार हिस्सा शासनाने भरावा.
 • जिल्हा तसेच तालुका पातळीवर पत्रकार भवन बांधकाम करण्यात यावे.
 • गृहनिर्माण योजने अंतर्गत प्रिंट मिडीया व इले.मिडीया पत्रकारांना घरबांधणीसाठी अर्थसाहाय्य देण्यात यावे.
 • अधिस्वीकृतीमधील जाचक अटी प्रिंट मिडीया व इले.मिडीया पत्रकारासाठी शिथील करण्यात याव्या तसेच अ व ब विभाग करण्यात यावा.
 • शासनाच्या सर्व जिल्हा व तालुका स्तरावरील शासकीय समित्यावर पत्रकारांची नियुक्‍ती करण्यात यावी.
 • पत्रकारांच्या कुटूंबाना शासकीय तसेच खाजगी रूग्णालयात मोफत उपचार करण्यात यावे.
 • पत्रकारांच्या मुला-मुलींना पदवी पर्यंतचे शिक्षण व शिष्यवृत्ती योजना जाहिर करण्यात यावी.
 • पत्रकारांना वृत्तसंकलन करण्याकरीता आधुनिक तंत्रज्ञान सगणक, डिजीटील मोबाईल देण्यात यावे. यामध्ये वृत्तपत्र मालकाचा सहभाग घ्यावा. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात यावे. या मागण्या बाबत आजतागायत पत्रकार संघाचा शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे.

मध्यातरीच्या काळामध्ये वृत्तपत्र व्यवसाय झाल्याने काही वृत्तपत्रांनी दर्जा न टिकविल्याने बातमीदाराकडे संशयी नजरेने पाहले जाऊ लागले. परंतु पत्रकारानी न डगमगता पत्रकारीतेचे कार्य सुरू ठेवल्याने लोकशाही जिवंत असल्याचे पहायला मिळत आहे.

पत्रकार संघाचे १. अमरावती (टॉऊन हॉल) २. कोडण्यपुर (अमरावती) ३. नागरवाडी (चांदुर बाजार ) ४. मोझरी (अमरावती) ५. जळगाव ६. शेगांव राज्यव्यापी अधिवेशन झालेले आहे.

भारतात विदेशाप्रमाणे प्रिंट मिडीया पेक्षा, इलेक्ट्रॉनिक खाजगी वाहिण्याचे प्रमाण वाढले आहे. रात्रो- मध्यरात्री जी बातमी चार ओळीत टीव्हीवर पाहली, ऐकली ती सविस्तर वाचण्यासाठी त्यांना सकाळच्या वृत्तपत्राची ओढ तीव्रतेने वाटु लागल्याने वृत्तपत्र विकत घेऊन वाचण्याची प्रवृत्ती वाचकात वाढीस लागली आहे.

सद्यास्थितीत संपूर्ण प्रशासन व शासन यंत्रणा पोखरून निघाल्याने दिसत आहे. शासन यंत्रणा काही ठिकाणी मृतवंत झाल्याचेही दिसत आहे. त्यामुळे समाजातील सर्वसामान्य माणुस हताथ झाला आहे. विधानसभा, लोकसभा ही लोकशाहीचे मंदीरे फक्त निजींवरूपी असल्याची दिसत आहे. त्यांचे कारण त्यामुळे काश्याकुट चर्चाच जास्त, गोंधळ जास्त दिसत आहे. भ्रष्टाचार सर्वव्यापी झाल्याचे दिसत आहे. या निराशाजनक वातावरणात जनतेला दोनच आशास्थाने वाटत आहे. १. न्याययंत्रणा २. वृत्तपत्र व इले. मिडीया त्यापैकी न्याय यंत्रणेला कायदे, पुरावे, कार्यप्रणाली, खर्च, कलावधी आदी मर्यादा आहे. त्यामुळे निराश झालेल्या सर्वसामान्यासाठी एकच आशास्थान उरले आहे ते म्हणजे प्रिंट मिडीया व इले. मिडीया यामुळे 'पत्रकारातीचे महत्व वाढले आहे.

राष्ट्रसंतानी ग्रामगीतेत संगीतल्याप्रमाणे-
मंथनकिया हर धर्म का, हर पंथ का, हर देशका ।
निकला यही मेरी समझ मे, सार शुभसंदेश का ।।
सब विश्‍व मानव मित्र बनकर, पास सबके आयेंगे ।
शांती तभी वे पायेंगे, नही तो खतम हो जायेंगे ।।

सर्व धर्म पंथाचा एकच सार आहे की, आपसातील सर्व मतभेद विसरून राष्ट्रातील सर्व लोकांनी सर्वांच्या हिताकरीता आणि विश्‍वात्मक शांतीकरीता एकच मार्ग अंगीकाराबा लागेल, आणि तो धर्म समन्वयाचा, शिस्तीचा राहील. यातच सर्वांना सुखसमृध्दी लाभेल हे जरी लोकाकरीता, जनतेकरीता आहे. त्यामध्ये पत्रकाराकरीता संदेश आहे. सर्व पत्रकारानी प्रिंट मिडीया असो वा इले. मिडीया एकत्र राहायला हवे. संघटनात्मक कार्यानेच पत्रकाराना न्याय मिळणार आहे. त्यामध्ये कार्यरत उपसामित्यानाही व्यासपीठ मिळाले आहे. या सर्वांचे न्यायहकासाठी अखिल भारतीय ग्रामीणपत्रकार संघ नेहमी आवाज उठविणार असुन कार्यरत राहणार आहे. जय पत्रकारिता, जिय हिंद ।

पत्रकार म्हणजे समाजप्रबोधनाची पखाल वाहणारा ' एक मनुष्य' या अनुषंगाने समाजात क्रांती घडवुन आणली. यामध्ये भारतीय स्वातंत्र्या अगोदर लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस यांनाही वृत्तपत्र माध्यमाचा स्वातंत्र्याकरीता आधार घ्यावा लागला होता. त्यावेळेस वृत्तपत्र प्रबोधनाचे, शिक्षणाचे, क्रांतीच्या आवाहनाचे, समाजबदलाचे माध्यम बनले होते. त्यावेळेस व स्वातंत्र सुरवातीच्या काळापासून विसाव्या शतकापर्यंत पत्रकार म्हणज पाटकोऱ्या कागदाचे चतकोर झोळीत भरून, काम चलाऊ लेखनी धारण करून बातम्या गोळा करणारी व्यक्‍ती, तिचा वेश कळकट आणि मळकट, दाडीचे खुंट वाढलेले, केस विस्कटलेले, जाडे-भरडे खादीचे कपडे, हॅन्डलुमची शबनम खांद्याला लटकविलेली असे पत्रकाराचे (बा्ताहार) स्वरूप होते. पत्रकारीतेचे देशातील मुळ स्वरूप समाज प्रबोधन, क्रांतीकारी लेखनीव्दारे इंग्रजांना देशातुन हाकलुन 'लावणेहे होते.

१९ व्या शतकाच्या अखेर देशात वृत्तपत्रात पत्रकारीतेला चांगले स्वरूप निर्माण झाले होते. आधुनिक जीवनावरील प्रसारमाध्यमाचा वाढता प्रभाव आणि नवनव्या तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळे वृत्तपत्राची संखात्मक तसेच गुणात्मक बाढ प्रचंड वेगाने झाली आहे. वृत्तपत्राची गुणात्मक व व्यवसायात्मक वाढ झाली असली तरी पत्रकार (वार्ताहार) हा दरिद्रच राहलेला आहे. पत्रकारिता ग्रामीण भागातुन सुरू झाली आहे. भुतकाळ पाहला तर रष्ट्रसंतानी ग्रामगीतेत सांगीतले प्रमाणे

खेड्यात उपजले ज्ञानेश्‍वरादी |
कोठे उणी त्यांची बलबुध्दी ।
श्रीकृष्ण आणि महात्मा गांधी |
हालावि सुत्रे खेड्यातुनी ॥

वरील ओवीप्रमाणे आज ग्रामीण पत्रकार, शहरी पत्रकार व सद्यस्थितीत इले.पत्रकार समासेवेकरीता चंदनासारखा झिजत आहे. त्याप्रमाणात त्यांना वृत्तपत्र मालक व शासनाकडून सोयीसुविधा मिळत नाही. रात्रंदिवस वृत्तपत्र बातम्याकरीता दौरे करणे व वृत्तपत्र मालकाचे आदेशानुसार जाहिरातीसाठी पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या हाजी हाजी करावे लागत आहे. तुटपूंज्या कमिशनाआधारे वार्ताहर कुटूंब चालवु शकत नाही इतके करूनही सगळ्या गोष्टीची घरात हनहन, खाण्यापिण्याची मारामार, कपड्याचा दुष्काळ अशा दरिद्रीत आजही काही पत्रकार जिवन जगत आहे. या सर्व पत्रकार मित्रांचे कुटूंबाचे आधारवड बनण्याकरीता पत्रकार संघटनाची गरज होती. त्यादृष्टीकोणातुन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा व रूक्मिणीचे माहेरघर असलेल्या अमरावती जिल्ह्यामध्ये ०४ एप्रिल १९९६ ला 'अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची स्थापणा करण्यात आली आहे.